Daily Updates!
Upcoming meets & events!
Welcome to our website!

About Us

प्रा.डॉ. प्रशांत विश्वेश्वरराव विघे

परिचय

प्रा.डॉ. प्रशांत विश्वेश्वरराव विघे हे भारतीय महाविद्यालय, अमरावती येथे राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण, संशोधन आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यांचा जन्म १ जुलै १९७८ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील दापोरी या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी विविध शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेतले असून सामाजिक आणि राजकीय विषयांवर विस्तृत संशोधन केले आहे. 

प्रा. डॉ. प्रशांत विघे हे सतत संशोधन, समाजसेवा आणि शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी कार्यरत असलेले प्रभावी नेतृत्व आहेत. त्यांनी शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पारदर्शक व्यवस्था आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांच्या शोधपूर्ण आणि मार्गदर्शक कार्यामुळे भविष्यात शिक्षण क्षेत्रात अधिक सकारात्मक बदल घडतील, यात शंका नाही.

पेक्षा जास्त संशोधन निबंध प्रकाशित
0
हून अधिक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषदा आयोजित केय आहेत.
0
स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथांचे लेखन
हून अधिक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषदा आयोजित केय आहेत.
0
  • एम.ए.राज्यशास्त्र,
  • एम.ए.समाजशास्त्र,
  • एम.ए.इतिहास,
  • एम.फील (वि.रा.शिंदे यांच्या सामाजिक-राजकीय चळवळींचे विश्लेषण)
  • पीएच.डी., (विदर्भातील नक्षलवादी चळवळींचा सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर पडलेल्या प्रभावाचे चिकित्सक अध्ययन [विशेष संदर्भ – गडचिरोली जिल्हा, कालखंड २००१ ते २०१०])
  • बी.एड.
  • मानवाधिकार आणि पत्रकारितेतील पदविका
  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य
  • राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे निर्वाचित सदस्य
  • शिक्षक कल्याण समिती सदस्य – शिक्षण धोरणात सक्रिय भूमिका
  • NUTA (Nagpur University Teachers Association) चे आजीव सदस्य – शिक्षकांच्या समस्यांसाठी कार्यरत
  • लोकप्रबोधन सामाजिक आणि संशोधन प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष
  • महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे आजीवन सदस्य
  • विदर्भ प्रांत राज्यशास्त्र परिषद सदस्य
  • भा.ल. फाउंडेशन – उपाध्यक्ष,
  • डॉ.व्ही.एम.पेशवे फाउंडेशन– सदस्य,
  • लोकप्रबोधन सामाजिक आणि संशोधन प्रशिक्षण संस्था – अध्यक्ष आहेत.
  • राज्यशास्त्र विषयाचा १९ वर्षांचा अध्ययन-अध्यापनाचा अनुभव
  • विद्यापीठ प्रशासनातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील
  • संचालक, सहसंचालक, उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्याशी समन्वय साधून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविणे
  • शैक्षणिक धोरण सुधारणा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय सुचवले
  • विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी मजबूत जनसंपर्क आणि पारदर्शक कार्यशैली

पुरस्कार आणि सन्मान

उत्कृष्ट संशोधन पेपर लिखाण पुरस्कार

(२०२१-२२)
महाराष्ट्र राज्य लोकप्रशासन परिषद

उत्कृष्ट संशोधन पेपर लिखाण पुरस्कार

(२०२२-२३)
महाराष्ट्र राज्य लोकप्रशासन परिषद

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

(२०२३-२४)
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती

उत्कृष्ट शिक्षक सेवा गौरव पुरस्कार

( २०२०- २०२१)
जमदाडे फाउंडेशन राज्यस्तरीय कार्यानिष्ठ शिक्षण पुरस्कार.

सर्वोत्कृष्ट महाविद्यालयीन मासिक पुरस्कार

(२०)
संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती.

सर्वोत्कृष्ट महाविद्यालयीन मासिक पुरस्कार

(२०)
संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती

परिचय

राज्यशास्त्र व इतर विषयाचे ३० पुस्तकाचे लेखन करून साईनाथ प्रकाशन, नागपूर साहित्य प्रसार केंद्र, नागपूर,  वेद मुद्रा प्रकाशन अमरावती अशा  विविध ठिकाणावरून पुस्तके प्रकाशित केले आहे; अनेक पुस्तकांचे संपादन; महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी,स्पर्धा परीक्षेसाठी  पुस्तके व संदर्भ ग्रंथांचे लिखाण केले आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचे प्रश्न जाणून घेणे; ते ज्या ज्या पातळीवर प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा करणे आणि ते सोडविणे हा त्यांचा आवडीचा प्रांत आहे. शिक्षण क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक सुधारणांसाठी केला आहे. शिक्षणाबरोबरच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सामाजिक कार्य आणि पारदर्शक व्यवस्थापन हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. डॉ. प्रशांत विघे, सिनेट सदस्य, हे शिक्षण क्षेत्रात मजबूत जनाधार असलेले प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शिक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता केवळ त्यांच्या नेतृत्वगुणांमुळेच नाही, तर त्यांच्या एकमत घडवून आणण्याच्या क्षमतेमुळे आणि विकासाच्या व्यापक दृष्टीकोनामुळे आहे. एक वेगळी ओळख म्हणजे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या विचारसरणीचा त्यांनी स्वीकारलेला नारा. ते नेहमीच प्रयत्नशील असतात की प्रशासन पारदर्शक राहावे आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक अडथळा न येता लोकांचे काम निशुल्क आणि सुलभ पद्धतीने पार पडावे. या धोरणामुळे अनेक शिक्षक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी ते आशेचा किरण ठरले आहेत.
त्याच्या नेतृत्वशैलीमध्ये तळागाळातील लोकांशी थेट संवाद आणि त्यांच्या अडचणींना प्राधान्याने सोडवण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. शिक्षण, प्रशासन आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते आपल्या कार्यामुळे वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत.

शिक्षण आणि समाजासाठी समर्पित नेतृत्व

शैक्षणिक क्षेत्रातील संस्था, अधिकारी किंवा शासन इथे सुरू असलेला सर्व  प्रकारच्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन  करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो. त्यासाठी सतत शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रश्न समजून घेण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे.

सहज, सोप्या भाषेत आणि वास्तववादी दृष्टिकोनातून शिक्षण व्यवस्थेच्या प्रश्नांवर मांडणी करतात.

त्यांनी शिक्षण, प्रशासन आणि समाजशास्त्रीय विषयांवर २० पेक्षा अनेक चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित करून शैक्षणिक विकासावर चर्चा घडून आणली आहे.

भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पारदर्शकता आणि शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांचा झपाटलेला दृष्टिकोन हा नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.